in

गडचिरोलीत सापडले बिबट्याचे बछडे, स्थानिकांनी काढले सेल्फी

व्येंकटेश दुडमवार | गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील पेपर मिल परिसरात बिबट्याची पिल्ले आढळल्याची घटना घडली त्या नंतर नागरिकांना याची माहिती मिळताच वनविभागाला माहिती देण्याऐवजी त्यांच्यासोबत सेल्फी काढून धोकादायकरित्या हाताळल्याचा व्हीडीओ समोर आलाय.
आष्टी येथील पेपर मिल परिसरात ही पिल्लं सकाळी आपल्या आईपासून दूर भटकली. सुरुवातीला ती मांजराची पिल्लं वाटली, पण नंतर लोकांच्या लक्षात आले की ती बिबट्याची पिल्लं आहेत. मग बघ्यांची गर्दी झाली आणि सुरू झाले फोटोसेशन. कुणी बसून, तर कुणी हातात घेऊन सेल्फी काढू लागला. फोटोची हौस भागल्यावर वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पिल्लांना ताब्यात घेऊन सुरक्षित करण्यात आले.
मादी बिबट शिकारीसाठी बाहेर पडल्यावर ही नवजात पिल्लं भटकली आणि इथे आली असावी, असा अंदाज आहे. आष्टी पेपर मिलच्या सभोवताल घनदाट जंगल असून, वाघासह इतरही प्राणी येथे आहेत. दरम्यान ही पिल्ल वनविभागाच्या ताब्यात असून आईचा शोध घेतला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दि पीपल्स फाउंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मोठी बातमी! आमदारांच्या स्थानिक विकास निधीत भरघोस वाढ