राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याअनुषंगाने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कोरोनाच्या सावटाखालीच 1 मार्चपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.
कामकाज सल्लागार समितीची आज (18 फेब्रुवारी) बैठक झाली. त्यात 8 मार्चपर्यंतच्या पहिल्या आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात आले. विधिमंडळात 8 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तथापि, वेगाने होणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, 25 फेब्रुवारी रोजी कामकाज सल्लागार समितीची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यात पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांची टीका
संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत जी चर्चा झाली ती पाहता फार काळ अधिवेशन चालवण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही. समितीच्या बैठका भरपूर होणार आहेत. परंतु कामकाज किती होईल याबाबत मनात साशंकता आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. वीजबिलासारखे अनेक विषय असल्याने पूर्ण चार आठवड्यांचे अधिवेशन घेतले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी मांडली.
Comments
Loading…