in

Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका

Share

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुचर्चीत ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर अक्षयच्या लुकबद्दल आणि भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अक्षयनं त्याच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केलाय. हॉरर कॉमेडी प्रकारात मोडणारा हा चित्रपट आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जिथं कुठं असला तिथंच थां बा, आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण आता लक्ष्मी बरसणार आहे,’ अशा कॅप्शनसहीत अक्षयनं या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मात्र चाहत्यांकडून समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना अक्षयचं हे रूप आवडलं आहे ,तर काहींनी चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी केलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग २०१९च्या एप्रिल महिन्यातच सुरु झालं होतं. चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तमिळ कॉमेडी भयपट ‘कंचना’चा रिमेक आहे. चित्रपटात अक्षयच्या अंगात भूत शिरणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता तरुण अरोरा दिसणार आहे. तरुणनं २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटात काम केलं होते. या चित्रपटात त्यानं करीनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती.’लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचं ठरलं होतं. परंतु, आता अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ ९ नोव्हेंबरला अर्थात दिवाळीच्या आठवड्यात प्रदर्शित करण्याचं निश्चित झालं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Maratha Reservation | तलवारीची भाषा का? तडजोडीची भाषा असली पाहिजे? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल