in ,

धक्कादायक: मुलगा झाला या खुशीत अक्ख्या गावात वाटले लाडू; आणि तोच निघाला कोरोनाग्रस्त

Share

जयपूर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढला असून केंद्र सरकारने आर्थिक नुकसान होत असून देखील संपूर्ण देशात खबरदारी म्हणून लॉकडाऊन जारी  केला आहे. मात्र, लोक अजून देखील खबरदारी घेताना दिसत नाहीत. याचाच प्रत्यय देणारी घटना राजस्थानमध्ये एका व्यक्तीमुळे घडली आहे. या माणसाच्या मुर्खपणामुळे अख्या गावावर कोरोनाची टांगती तलवार उभी राहिली आहे.

लॉकडाऊन मध्ये एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी मज्जाव केला आहे. तरीही महाराष्ट्रसह अनेक राज्यांत अजून देखील लोक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. एकीकडे कर्नाटकचे मुख्यामंत्री मुलाचे लग्न धुमधडाक्यात साजरा करत आहेत. तर दुसरीकडे राजस्थान मधील दौसा जिल्ह्यातील एका गावातील एका व्यक्तीने मुलगा झाला या खुशीत संपूर्ण गावात लाडू वाटले. तो व्यक्ती स्वतःच एक सरकारी लॅब टेक्निशियन असल्याची माहिती मिळावी आहे.  मुलगा झाल्याने आनंद व्यक्त करण्याच्या नादात हा व्यक्ती स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा व्यक्ती छारडा येथे लॅब टेक्नीशिअन असून याला दौसा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये ड्युटी वर पाठवण्यात आले होते. ११ एप्रिल पासून त्याला काम देण्यात आले होते. त्यावेळी त्याची गर्भवती पत्नी सरकारी दवाखान्यात भरती होती. तिला १५ एप्रिलला मुलगा झाला. त्यानंतर या व्यक्तीने २१ एप्रिल रोजी स्वतःला कामातून सूट मिळवत पुन्हा छारडा येथे आपली ड्युटी लावून घेतली. व आपल्याला मुलगा झाला या आनंदात संपर्ण गावात लाडू वाटले. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेकडो गावकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आता प्रशासनाचा ही गोंधळ उडाला आहे.

या टेक्निशियने त्याच्या गावी लाका बेराउंडा, बहिणीच्या गावी आभानेरी, छारडा हॉस्पिटल आणि आजूबाजूचे गाव तसेच हौसा हॉस्पिटल परिसरात बत्ताशे आणि लाडू वाटले. तो आपल्या बहिणीच्या घरी असताना त्याचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सध्या हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्यांची कोरोना टेस्ट घेतली जात आहेत. या कर्मचाऱ्याची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, त्याने घरी राहण्याची सूचना पाळली नाही आणि त्यामुळे आता संपूर्ण गावात गोंधळ उडाला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बर्थडे स्पेशल: जेव्हा सचिन तेंडुलकर जबरदस्तीने विकेटकीपर बनला, आणि डोळा फुटता फुटता…

पीएम मोदींनी सरपंचांना सांगितले: आता ड्रोनच्या माध्यमातून होणार गावांचे मॅपिंग, हे आहेत महत्वाचे मुद्दे…