in ,

कृष्णा हेगडे यांचा भाजपला रामराम, या पक्षात प्रवेश…

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईमध्ये माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलाय. कृष्णा हेगडे हे गेल्या काही काळापासून भाजपमध्ये होते. पण तिथे ते अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेते प्रवेश केलाय.

कृष्णा हेगडे हे मुळचे काँग्रेसचे होते. त्यांनी मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूकही जिंकली होती. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे. पराग अळवणी हे भाजपचे तिथले आमदार आहेत. विलेपार्लेमध्ये कृष्णा हेगडे यांना वाव मिळत नव्हता आणि ते गेल्या काही काळापासून अस्वस्थ असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे ते भाजपला राम राम ठोकतील अशी शक्यताही वर्तवली जात होती. शुक्रवारी अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं आहे.

शिवसेनेचा विलेपार्लेत भाजप आणि मनसेला डबल धक्का
विलेपार्ले मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा घेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांनीही हाती शिवबंधून बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी, अशोक चव्हाण यांची मागणी

…तशी नाचक्की ना? अतुल भातखळकर यांचा काँग्रेसवर पलटवार