in , ,

धर्मांतर केलं नाही, पण सासू मुस्लिम होती; क्रांती रेडकरचं धर्मांतराच्या आरोपावर उत्तर

केंद्रीय नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिका यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता समीर वानखेडे नक्की कोण? समीर ज्ञानदेव वानखेडे की समीर दाऊद वानखेडे?… समीर ज्ञानदेव वानखेडेंचा समीर दाऊद वानखेडे कधी झाला? असे एक ना अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आणि या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू झाली.

यावर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी या धर्मांतराच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर त्यांच्या विवाहाचा फोटो पोस्ट करून कमेंट केली आहे. मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्माचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहे. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. आमचं लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झालं आहे, असंही क्रांतीने सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हिरो नंबर वन ‘झी मराठी २०२१’ च्या मंचावर

आर्यन खान प्रकरणातील फरार किरण गोसावी पोलिसांना शरण येणार?