in

कोल्हापुरात उभारलं लहान मुलांचे पहिले कोविड सेंटर

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय तिसऱ्या लाटेच्या सुद्धा भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुद्धा सर्वांनाच सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील पहिले लहान मुलांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमधील सर्वच भिंतींवर विविध कार्टूनचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत.माणगाव ग्रामपंचायत संचालित जिल्ह्यातल्या या पहिल्या कोविड सेंटरची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सरपंच राजू मगदूम आणि उपसरपंच अख्तर भालदार यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीने हे कोविड सेंटर आकर्षक करण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. विविध कार्टून्सची चित्र सर्वच भिंतीवर रेखाटून भिंतीच बोलक्या केल्या आहेत. विशेष म्हणजे अनुभवी डॉक्टरांचे सुद्धा या कोविड सेंटरला सहकार्य असणार आहे.कोरोनाला थोपवण्यासाठी माणगाव ग्रामपंचायतीने आजपर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये आपली सुरक्षा आपल्या हातात आहे हे लोकांना समजावून सांगणारी ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच माणगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘Maratha Reservation साठी पंतप्रधानांना पाठवणार एक कोटी पत्रं‘ राष्ट्रवादी युवकची नवीन मोहीम

अंबरनाथमध्ये सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली