in ,

रुग्णांना वाऱ्यावर सोडलं जात नाही

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न सर्वांच पडला आहे. या पार्श्वभूमीवर ‘राज्यातील रुग्णांना वाऱ्यावर सोडल जात नाही’ असे म्हणतं महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच प्रमाणे येत्या दोन दिवसात रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवणार येणार आहेत. ऑक्सिजन रिफिलिंगसाठी वेळ लागत असून, लवकरात लवकर ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यात येतील त्याचा प्रमाणे लसीचा पुरवठा संथ गतीने होत आहे .अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. रुग्णालयांच्या मागणीनुसार त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. भाभा शताब्दी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे . यावेळी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे , विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन देखील महापौरांनी यावेळी केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मी बंगालमधील माझ्या सर्व रॅली रद्द केल्या, तुम्ही कधी करणार?

लाेटे एमआयडीसीत भीषण स्फाेट; तिघांचा मृत्यू