in ,

कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्याने किरीट सोमय्यांची मुंबईत पोलिसांविरोधातच तक्रार

“कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी असताना मला घरात कोंडून ठेवण्यात आलं. कायदेशीर नोटीस दिल्यावर जाऊ दिलं आणि त्यानंतर सीएसटीबाहेर मी जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारच्या पोलिसांनी गुंडगिरी केली. म्हणून अधिकृत तक्रार करण्यासाठी मी आलो आहे. परिणामी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्याने मुंबईत पोलिसांविरोधातच तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. २४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

“मी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि एसपींना पुन्हा पत्र लिहिलं आहे. २० तारखेचा स्थगित झालेल्या दौऱ्यासाठी पुढील मंगळवार आणि बुधवारी जाणार आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. दरम्यान त्यांनी दौऱ्यासाठी परवानगी मिळेल का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशाप्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? किरीट सोमय्याला एवढे का घाबरतात? उद्या उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पाहण्यासाठी गेल्यानतंर हे काय करणार?”.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार

… म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन