in

किरीट सोमैया मुख्यमंत्र्याविरोधात आयकर विभागात; चौकशीची मागणी

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपाचे किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आयकर विभागात तक्रार दाखल केली आहे. अलिबागच्या कोरलाई भागात बेनामी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधा कारवाईची मागणी सोमैयांनी केलीय. आयकर विभागाचे डायरेक्टर जनरल एमव्ही भानुमाथी यांची भेट घेऊन संबंधित मालमत्तेचे १७ प्रकारचे पुरावे सादर केल्याची माहिती सोमैयांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या मालमत्तेची नोंद नाही, असा आरोप सोमैयांनी केलाय. त्यांनी या प्रकरणाचा संबंध अन्वय नाईक यांच्याशी असून मागील आठ वर्षांपासून नाईक यांच्या नावाने हा कर रश्मी ठाकरे भरत असल्याचे त्यांनी सांगितले.

लक्ष विचलित करण्यासाठी भारतरत्नांची चौकशी

मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांची चौकशी ठाकरे सरकार करणार आल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. शेतकरी आंदोलन संदर्भात ट्विट केल्याने ठाकरे सरकार ही कारवाई करत असल्याचं किरीट सोमैया यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अकोलासाठी 185 कोटींच्या निधीवरून बच्चू कडूंची नाराजी

आंगणेवाडी यात्रा रद्द; भराडी देवीला घरूनच नमस्‍कार करा