in

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना करोना

देशात सर्वत्र करोना विषाणूने थैमान घातले आहे. अशातच केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. ही माहिती रिजिजू यांनी स्वतः ट्‌विटरवरुन दिली आहे. ‘करोनाची पुन्हा तपासणी झाल्यानंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी डॉक्‍टरांचा सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाइन व्हावे आणि स्वतःची चाचणी करावी. मला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत आहे, असे रिजिजू यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

टिहरी येथे शुक्रवारी ‘वॉटर स्पोर्टस अँड ऍडवेंचर इन्स्टिट्यूट’ या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी रिजिजू उत्तराखंडमध्ये गेले होते. गुरुवारी रिजिजूंनी उत्तरकाशी जिल्ह्यातील निलोंग व्हॅली प्रदेशला भेट दिली. यात इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) महासंचालक सुरजितसिंग देसवाल हे देखील त्यांच्यासमवेत होते.अरुणाचल प्रदेशच्या अरुणाचल पश्‍चिम मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार रिजिजू अल्पसंख्याक कार्यमंत्री देखील आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

CSK vs RR | आज चेन्नईचा राजस्थानशी मुकाबला