in

‘खुलता कळी खुलेना’ मालिका फेम मयुरीच्या पतीने केली गळफास लावून आत्महत्या

'Khulta Kali Khulena' series Fame Mayuri's husband commits suicide by hanging
Share

खुलता कळी खुलेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा घरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाखरे याने नुकतीच आत्ममत्या केली आहे. नांदेडच्या त्याच्या राहत्या घरी आशुतोषने आत्महत्या केली असून सध्या या बातमीने मराठी सिनेमसृष्टीत खळबळ माजली आहे. आशुतोषने आतापर्यंत अभिनेता तसंच निर्मात्याचही काम केलं आहे. मयुरीसोबत काही वर्षांपूर्वी तो विवाहबंधनात अडकला होता.

आशुतोषने काही दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचं सखोल विश्लेषण या व्हि़डिओमध्ये केलं गेलं होतं. त्यामुळे आता हा व्हिडिओ म्हणजे त्यानं दिलेला संकेत होता का? अशी चर्चा रंगली आहे. त्याने नेमकं हे टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मयुरीच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला असून यावर प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

सध्या सुरू असलेल्या मनोरंजन विश्वातील या सगळ्या घडामोडी पाहाता नक्कीच बरेच विचार मनाला शिवून जातात. मयुरीच्या दुःखात सामिल होत अनेक चाहते यावर व्यक्त होताना दिसतील मात्र आशुतोषने हे पाऊल का उचलंलं याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

What clothes will Lord Ramallah wear on the 5th, orange or green?

भगवान रामलल्लाचे कपडे भगवे की हिरवे, 5 तारखेला कोणते कपडे परिधान करणार?

Riya seeks help from most expensive lawyer to escape charges

आरोपातून वाचण्यासाठी रियाने मागितली सर्वात महागड्या वकिलाची मदत, दिवसाला घेतात इतके लाख रुपये