in

खेड तालुक्यात एकाच गावात २७ कोरोनाबाधित रूग्ण

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना आटोक्यात येत आहे असे वाटता असतानाचा कोरोनाने आपले डोके पुन्हा एकदा वरती काढले आहे. रत्नागिरीमधील आंबवली वरवली धुपे वाडीतील तब्बल २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर. बी. शेळके यांनी ही माहिती दिली आहे. एका वेळी एकाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.

९ फेब्रुवारी रोजी वरवली धुपेवाडीमधील एक रुग्ण आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याचे नमुने घेतले असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाच्या संपर्कातील ४७ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामधील तब्बल २७ जणांना करोनाचा प्रादूर्भाव झाला असल्याची बाब उघड झाली. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सर्व करोनाबाधितांना कळबणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील गावातील अन्य लोकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबवली येथील महाविद्यालय १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘झोंबिवली’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

Ind Vs Eng : अश्विनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडसमोर 482 धावांचे आव्हान