in

करूणा शर्माच्या कोठडीतला मुक्काम वाढला!

करुणा शर्मांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे करुणा शर्मांच्या कोठडीत 18 सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा या सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. काही दिवसांपूर्वी त्या परळीमध्ये आल्या होत्या आणि परळीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अंबाजोगाईच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांच्या जामिनासाठी अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता आणि याच जामिनाच्या अर्जावर आज अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये सुनावणी पार पडलीय .या सुनावणीत अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. तपास अधिकारी प्रत्यक्षात हजर नसल्याने तारीख वाढली आहे. त्यामुळे करुणा शर्मांच्या कोठडीत 18 सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.

What do you think?

-8 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

S.v.road Bhayandar east

बलात्काराच्या घटनेने पुन्हा मुंबई हादरलं; 7 वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म