in

Karnataka CM BS Yediyurappa: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्‍पा यांना कोरोनाची लागण

Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच, त्याच्या थोड्याच वेळात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त समोरे आले.यासंदर्भात येडियुरप्पा यांनी रविवारी उशिरा रात्री ट्विटवरुन माहिती दिली.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विटवरुन येडियुरप्पा यांनी सांगितले. या ट्विटवर सुप्रिया यांनी ११ वाजून ५४ मिनिटांनी प्रतिक्रिया देताना, “सर कृपया काळजी घ्या. तुम्हाला लवकर बरं वाटावं अशी इच्छा व्यक्त करते,” असं म्हटलं आहे.येडियुरप्पा यांच्या या ट्विटवर केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रिप्लाय करून त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दुसरे मुख्यमंत्री बाधित

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा हे कोरोनाची लागण झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाचा लागण झाल्याचे ट्विटवरुन सांगितलं होतं.सध्या शिवराज यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त, अभिषेकवर उपचार सुरू

Maharashtra ex chief Minister Manohar Joshi’s wife Dies;शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांना पत्नीशोक