in

महिला दिना’च्या निमित्ताने करीनाने शेअर केला दुसऱ्या बाळाचा फोटो

नुकतेच दुसऱ्या बाळाला जन्म देऊन चर्चेत असणाऱ्या करीनाने महिला दिनाचे निम्मित साधत सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘एक स्त्री करू शकत नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही’, असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे. करीना कपूर-खानने सगळ्या महिला चाहत्यांना ‘जागतिक महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा देताना शेअर केलेल्या फोटोमध्ये करीनाच्या घरी आलेल्या चिमुकल्या पाहुण्याची पहिली झलक तिच्या चाहत्यांना दिली आहे. करीना-सैफच्या घरी आगमन झालेल्या या चिमुकल्या पाहुण्याला पाहण्यासाठी दोघांचेही चाहते उत्सुक आहेत. अशावेळी करीनाने खास महिला दिनाचे औचित्य साधत दुसऱ्या लेकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला . बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफअली खान यांना 21 फेब्रुवारी रोजी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. आता करीना आणि सैफच्या चाहत्यांना या चिमुकल्या पाहुण्याच्या नावाची प्रतीक्षा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुस्तीपटू विनेश फोगाटची ‘सुवर्ण’कमाई

एनआयएकडे तपास देण्याचा डावात काहीतरी काळंबेरं-उद्धव ठाकरे