आपल्या असंख्य विधानांमुळे अडचणीत सापडलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यावेळी कंगनाने आपल्यावर महाराष्ट्रात असलेले सर्व खटले हिमाचल प्रदेशमध्ये हस्तांतरीत करण्याची मागणी केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कंगना रणौतवर सध्या मुंबईमत तीन खटले दाखल झाले आहेत.यावर दोन खटले हे तिने मुंबईबाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्विट्सविरोधात आहेत. तर, तिसरा खटला हा गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने त्यांच्याविरोधात टिप्पणी केली होती. यामुळे त्यांनी तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
या सर्व खटल्यांची सुनावनी मुंबईत सुरू आहे. त्यात मुंबईमधील शिवसेना नेत्यांचे आपल्यासोबत वैर असून, मुंबईमध्ये आपल्या खटल्यांवर सुनावणी झाल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याचे कंगना आणि तिच्या बहिणीने म्हटले आहे. त्यामुळे कंगना रणौतने महाराष्ट्रात असलेले सर्व खटले हिमाचल प्रदेशमध्ये हस्तांतरीत करावेत अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
नुकतीच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची बदनामी केल्याप्रकरणी कंगना राणावतला अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले होते. याविषयी १ मार्चला सुनावणी होती. मात्र, सुनावणीस गैरहजर राहिल्यानं न्यायालयाकडून कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसंच, २६ मार्चला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कंगनाला बजावण्यात आले आहेत.
Comments
Loading…