in

कंगणाचे पुन्हा ट्वीट; मुंबईबद्दल केल ‘हे’ विधान

Share

देशभरात गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच वादाचा सामना रंगला आहे. हा सामना थांबता थांबत नाही आहे, त्यात मुंबईतून आज घरी जाता-जाताना कंगणाने पुन्हा एक ट्वीट केले आहे. या वादावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबईत आलेली कंगना आता आपल्या गावी मनाली येथे जात आहे. यावेळी जाता जाता कंगनाने पुन्हा एकदा ट्वीट केलेय. या ट्वीटमध्ये ती म्हणते, “मी जड मनाने मुंबईतून जात आहे. गेल्या काही दिवसांत मला प्रचंड त्रास दिला गेला. माझ्यावर हल्ला झाला. खोटे आरोप केले गेले. माझं कार्यालय तोडलं. माझं घर तोडण्याची धमकी दिली गेली सुरक्षारक्षक हत्यारं घेऊन माझं संरक्षण करतायत. मला वाटतंय पाकिस्तानशी तुलना करणं योग्यचं होतं,असे ट्विट करून कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पंतप्रधान मोदी यांचे कोरोना संदर्भात जनतेला आवाहन…

माजी सैन्य अधिकारी मारहाण प्रकरणी नवनीत राणांची संरक्षण मंत्र्यांकडे तक्रार