in

नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण अन् कंगना पुन्हा बरळली…

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आणि ते दिल्लीत दाखलही झाले पण त्याला हिंसाचाराचे वळण लागले. याच निमित्ताने कंगना रणौतने एक ट्विट करत पुन्हा एकदा या आंदोलकांना दहशतवादी म्हटले आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्याची मागणी तिने केली आहे.


कंगनाने आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कथित आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला आणि तिथे खलिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. या सर्व घटनांमुळे आज जगात आपण चेष्टेचा विषय ठरलो आहोत. कोरोना महामारीशी आपण धैर्याने लढा दिला आहे. आपण कोरोना प्रतिबंधक लसची निर्मिती केली आहे. अशा या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा प्रजासत्ताक दिन आनंदाचा ठरला असता. मात्र, देशभरातून आणि लाल किल्ल्यावरुन जे फोटो आले आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत, असे तिने या व्हिडीओत म्हटले आहे.
“स्वतःला शेतकरी म्हणवणाऱ्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या सर्वांना तुरुंगात डांबले पाहिजे. त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली पाहिजे. एक पाऊल पुढे टाकले की, बाकीचे आपल्या खेचून दहा पावले मागे नेतात. आपले वागणेही अडाण्यासारखे आहे. हा देश, सर्वोच्च न्यायालय, सरकार हे सर्व चेष्टेचा विषय बनले आहेत. यामुळे या देशाचे काहीही होणार नाही. आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत, असे तिने म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता जो बायडेनचा राजीनामा मागणार का? दिल्लीतील हिंसाचारावर संजय राऊत यांची तिखट प्रतिक्रिया

कृषी कायद्यांना विरोध : केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी करण्याची अण्णांची तयारी