in

कांदिवली बनावट लसीकरणाची हायकोर्टाकडून दखल

मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या बनावट लसीकरण घोटाळ्याची मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मोठ्या रुग्णालयांचा वापर करून कोरोनाकाळात हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे अशा लसीकरण कॅम्पवर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा? अशी विचारणा मंगळवारी हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबई महापलिकेला केली.

या बोगस लसीकरणाविरोधात लोकशाही न्यूजनं विशेष मोहीम उघडली होती. कांदिवलीच्या बोगस लसीकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सिद्धार्थ चंद्रशेखर यांनी जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणीवेळी खासगी लसीकरण केंद्रावरच्या बोगस लसीकरणाचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं कांदिवली घटनेवर काय करवाई करण्यात आली अशी विचारणा पालिका प्रशासनाकडे केली. त्यावर या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका डॉक्टरचाही समावेश असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी राज्याची फेरविचार याचिका

UNHRCमध्ये भारताचा पाकवर हल्लाबोल