in

कुठून येतो एवढा confidence? कंगनाचा ट्विटरला बॅन करायचा इशारा

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या ट्विटरवर वादग्रस्त विधाने पोस्ट करून अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर कंगनाने तिच्यावर आगपाखड केली. रिहानाच्या ट्विटला प्रतिउत्तर देत कंगनाने तिला धारेवर धरलं होतं. तिने आपल्या ट्विटमध्ये दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी नसून दहशतवादी आहेत, असं म्हटलं होतं. कंगनाने ट्विटमध्ये वापरला केलेल्या ओळी ट्विटरच्या नियमांचे भंग करत आहे, म्हणून हे ट्विट तिच्या ट्विटरवरून काढून टाकण्यात येत आहे. असे स्पष्टीकरण ट्विटरकडून देण्यात आले आहे. रिहानाप्रमाणे कंगनाने शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्या अनेक कलाकारांवर आणि खेळाडूंवर देखील ट्विटरच्या माध्यमातून टीका केली.

या संदर्भात अकलेचे तारे तोडत आता कंगनाने ट्विटरला भारतात बॅन करायचा इशारा. ट्विटरला उद्देशून कंगनाने ट्विट केले आहे ज्यात ट्विटर हे चीनच्या हातातील खेळण्यातील बाहुलीच आहे, ट्विटच्या कोणत्याच नियम मी भंग केले नाहीत तरी सुद्धा माझे 2 ट्विट डिलीट केले गेले. ज्याप्रमाणे टिक टॉक भारतात बंद झाले आहे तसेच ट्विटर देखील बंद होईल करेन असा इशाराच कंगनाने ट्विटरला दिला आहे.

कंगनाचे वादग्रस्त ट्विट

अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबरच तिचा वाद चांगला गाजला. दिलजीतला तिने खलिस्तानी म्हटले. शेतकऱ्यांबद्दलही तिने प्रक्षोभक टिप्पणी केली. त्यामुळे अनेक युझर्सनी टि्वटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली व तिच्या टि्वटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली.

रोहित शर्माला काय म्हणाली कंगना :
शेतकरी देशाचा खूप महत्वाचा भाग आहेत. भारत प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच सक्षम राहिला आहे. हा प्रश्न देखील लवकरच सोडवला जाईल असा विश्वास आहे. अशा आशयाचे ट्विट रोहित शर्मा यांनी केले होते त्याला उत्तर देताना ”हे सर्व क्रिकेटर त्यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी झाल्यासारखे का बोलत आहेत. देशात क्रांती घडवणाऱ्या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का, हे ते का विचारत नाहीत. हे सर्व दहशतवादी आहेत… हे एवढ बोलायला घाबरताय कशाला?,”असं ट्विट कंगनाने केले आहे.

सोशल मीडियावर वारंवार कंगना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणत असल्याने पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना तिच्यावर प्रचंड भडकली. हिमांशीने कंगनाला ट्विटरवर तिच्याच भाषेत उत्तर दिलं. हिमांशीने ट्वीट करत लिहिलं की, ‘हे जे प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणत आहेत, त्याचे पडसाद कुठपर्यंत उमटतील याची जाणीव तुला आहे का? संपूर्ण जग आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघेल. आपल्या नवीन पिढीला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल, याचा विचार का नाही करत? स्वतःच्या फायद्यासाठी एका मोठ्या समुदायावर प्रश्नचिन्ह उभं करताय? का?’ हिमांशीने तिच्या ट्विटरवर आणखी एक पोस्ट टाकली, ज्यात ती कंगनाला प्रश्न विचारतेय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता चेक क्लिअरिंगला वेळ लागणार नाही, RBI चा मोठा निर्णय

देवाच्या नावाने पैसा गोळा करणारी भाजपा बेशरम…