in

राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत; कल्याणमध्ये हॉटेल मालकांनी वाटले पेढे

सुरेश काटे | राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळा रात्री 10 वाजेपर्य़त वाढवून देण्याचा निर्णय झाला. या निर्णयाचा आता हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी स्वागत केले आहे. कल्याणमध्ये पेढे वाटून हा निर्णय साजरा केला.

साधारणपणे एक आठवड्यापूर्वीं राज्य शासनाने राज्यातील निर्बंध शिथिल करत दुकानदारांसाठी असणारी वेळ वाढवून दिली. मात्र त्यामध्ये हॉटेल-व्यावसायिकांचा कोणताही विचार न झाल्याने राज्यातील हॉटेल असोसिएशनने निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच वेळ वाढवून दिली नाही तर हॉटेल बंद करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथाही मांडल्या होत्या.दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळा वाढवून देवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

गेल्या काही दिवसांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना राज्य शासनाने अखेर गुड न्यूज दिली आहे. इतर दुकानांप्रमाणे आता हॉटेल – रेस्टॉरंटलाही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा निर्णय समजताच कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खेड, चिपळूणमधील अतिवृष्टी; मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत २३ लाखांचे वाटप

नेपथ्य चोरी प्रकरणावरून श्रेयसचा खुलासा