in ,

महापालिका निवडणुकीत फक्त आश्वासन देणे, याला म्हणतात टाइमपास; मनसेचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेने नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे ती संघटना आहे, की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे”, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. आता आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर मनसेही प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ” असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते, याला म्हणतात, टाइमपास असे म्हणत मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी तीन खणखणीत ट्विट करत आदित्य ठाकरे यांना सुनावलं आहे.

तसेच कोरोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते, याला म्हणतात, टाइमपास..

“औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली, याला म्हणतात, टाइमपास, असं म्हणत आदित्य ठाकरेंना कीर्तीकुमार शिंदे यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि शिवसेनेचा वाद आणखी चिघळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Farmers Protest : हरयाणा जिल्ह्यांमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद

झपाटलेला’मधील ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड