in

आज एमपीएससीची संयुक्त परीक्षा; परीक्षेला जाताना अशी घ्या काळजी!

कोरोनामुळं पुढं ढकलण्यात आलेली एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा आज पार पडत आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ साठी ही परीक्षा घेतली जात आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती.

मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.मात्र, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, कोरोनामुळं पुढं ढकलण्यात आलेली एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा आज पार पडत आहे. तसेच एमपीएससी परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षास्थळी लवकर पोहोचता यावं यासाठी त्यांना मुंबईमध्ये लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

परीक्षेसाठी जाताना ‘ही’ काळजी घ्या :

● मास्क आणि सॅनिटायझर सोबत ठेवा
● परीक्षेसाठीचं हॉल तिकिट म्हणजे प्रवेशपत्र प्रिंट काढून घ्या.
● आपल्या ओळखपत्राची एक प्रत सोबत असू द्या.
● ब्लॅक पेन सोबत घ्या.
● स्वत:ची पाण्याची बाटली सोबत ठेवा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावती महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा संप, शहरातील कचरा रस्त्यावर पडून

तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, एका कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू, 5 जखमी