in

इंग्लंड ८ बाद ५५५… जो रूटचा द्विशतकी दणका

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार मालिकांमधील पहिल्या कसोटी सामन्याला कालपासून चेन्नईत सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने दिवसअखेर ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटच्या दमदार द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडचा संघ पाचशेपार गेला आहे. तसेच डॉम सिबली, बेन स्टोक्स यांनीही अर्धशतकं झळकवत धावांचा डोंगर उभारला. आजच्या दिवसातील पहिल्या दोन सत्रांमध्ये इंग्लंडने वर्चस्व ठेवले. मात्र अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसं यश मिळालं.

जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. दोघांनी ९२ धावांची भागिदारी रचली. यानंतर बेन स्टोक्स झेलबाद झाला. मात्र जो रूट याने शानदार द्विशतक झळकावले. १०० व्या कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे. रूटने १९ चौकार आणि दोन षटकारांसह २१८ धावा फटकारल्या. त्यानंतर पोप ३४ बटलर ३० झटपट बाद झाले. डॉम बेस २८ आणि जॅक लीच ६ यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला.

दरम्यान, इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीरांची कामगिरी समाधानकारक असली तरी मधल्या फळीतील फलंदाजांनी धावांचा डोंगर रचला. बुमराहने डॅन लॉरेन्सला पायचीत केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बीडमध्ये अंधश्रद्धेची परिसीमा : करणी केल्याच्या संशयातून चिमुकल्याची हत्या

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच…पवारांचे संकेत