in

“दरेकरांच्या गळ्यात भाजपची माळ आणि पायात चाळ”

राष्ट्रवादी युवती संघटनेच्यावतीने सातारा राष्ट्रवादी भवन येथे भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महिलांविरोधी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला काळे फासून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

तसेच प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात भाजपची माळ आणि पायात चाळ असून ते कुठं जातात हे आम्हाला माहिती आहे. दरेकरांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा दरेकरांना साताऱ्यात पाऊल ठेऊ देणार नाही असे राष्ट्रवादी महिला युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी यावेळी सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विनोदवीरांना मिळाली बिग बींची कौतुकाची थाप

‘सोमय्या यांनी चंद्रावर, मंगळावर जावं आणि…’