in ,

Phone Tapping; रश्मी शुक्लांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला; जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र

राज्यात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून रान उठले असतानाच आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्यातील मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून राजकारण तापले आहे. यावर आता रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याचबरोबर शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे टीकास्त्र त्यांनी डागले.

राज्यातील फोन टॅपिंग प्रकरण गंभीर असून, रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. “कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. मात्र रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेतली होती का? त्याचे उत्तर सिताराम कुंटे यांनी नाही असे दिले आहे. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होतं. त्यांचं एक पत्र उघडकीला आलं आहे. यात त्यांनी माझी चुकी झाली असल्याचं सांगत माफी मागितली आहे.

रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात हे सर्व प्रकार केले आहेत. त्याचा उपयोग आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरुद्ध होत असल्याचा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबईतील गुन्हा रद्द करा, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पालिका म्हणते, मुंबईत लॉकडाऊन नाही, पण…