in

IPL 2020 लाईव्ह पाहण्यासाठी JIO चा नवा ‘प्लॅन’

Share

इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत. त्यासाठी अनेकांनी ‘हॉटस्टार’चं सबक्रिप्शनही घेण्याची तयारी केली असेल किंवा आतापर्यंत घेतलंही असेल. पण, जर तुम्ही JIO चे ग्राहक आहात, तुमच्यासाठी JIOनं नवीन क्रिकेट प्लॅन आणले आहेत आणि ते घेतल्यावर तुम्हाला Disney+Hotstar VIP चं सबक्रिप्शन मिळणार आहे. JIOनं त्यांच्या पाच नवीन प्लॅनमध्ये Disney+Hotstar VIP चा समावेश केला आहे.

JIOने 1, 2, 3 महिने आणि 1 वर्षांसाठीचे प्रीपेड प्लॅनची घोषणा केली आहे. त्यात तुम्हाला 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP चं सबक्रिप्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना IPL 2020च्या सामन्यांसाठी वेगळी रक्कम मोजण्याची गरज नाही.

प्लॅन्सची माहिती…

1) 401 रुपयांचा प्लॅन – 3GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 28 दिवस)
2) 598 रुपयांचा प्लॅन – 2 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 56 दिवस)
3) 777 रुपयांचा प्लॅन – 1.5 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 84 दिवस)
4) 2599 रुपयांचा प्लॅन – 2 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIP सबक्रिप्शन ( प्लॅन मर्यादा 365 दिवस)
5) 499 रुपयांचा Data Add-on प्लॅन – 1.5 GB डाटा/प्रती दिन, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 1 वर्षाचं Disney+Hotstar VIPचं 399 रुपयाचं सबक्रिप्शन, ( 499 रुपयांचा Data Add-on प्लॅन मर्यादा 56 दिवस)

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता ‘चायनीज हँडसेट’ मोदी सरकारच्या रडारवर

दिलासादायक ; शास्त्रज्ञांनी तयार केले कोरोनाचे औषध