in

जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन उद्या लाँच होणार

JioPhone Next हा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन उद्या 10 सप्टेंबर रोजी बाजारात लाँच होणार आहे. जिओने या फोनच्या रिलीज डेटची घोषणा केली, परंतु किंमत, स्पेसिफिकेशनस् आणि इतर फीचर्सची अद्याप माहिती दिलेली नाही.

तसंच हा स्मार्टफोन कसा खरेदी करता येईल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु ऑफिशिअल वेबसाईट, रिलायन्स स्टोर्स आणि रिटेल शॉप्सवर फोन उपलब्ध असेल असा अंदाज आहे.भारतात JioPhone Next च्या किमतीचा तसंच फीचर्सचा अधिकृतरित्या खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु मिळालेल्या लीकनुसार, Jio स्मार्टफोन 3 हजार 499 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, JioPhone नेक्स्टमध्ये 5.5-इंची HD डिस्प्ले, क्वालकॉम QM215 SoC असण्याची शक्यता आहे.हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यात 2GB RAM + 16GB स्टोरेज आणि 3GB RAM + 32GB स्टोरेज समाविष्ट असेल.

2GB RAM ची किंमत जवळपास 3499 असू शकते. तर टॉप एंड मॉडेलची किंमत जवळपास 5,000 रुपयांपर्यंत असू शकते.फोनच्या रियर पॅनलवर 13 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनला फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सल सेंसर असणार आहे. तसंच 2,500mAh बॅटरी, डुअल सिम, ब्लूटूथ v4.2, GPS कनेक्टिव्हिटी आणि 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्टचा समावेश असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Sadan scam case | एक रुपयाही आम्हाला मिळाला नाही, तरीही आरोप – छगन भुजबळ

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी पादचाऱ्याचा मृत्यू