in

JEE मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका जाहीर, निकाल लवकरच

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन मार्च सत्राची अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली. जेईई मेन मार्च 2021 सत्राची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्चला झाली होती. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन अंतिम उत्तरतालिका पाहू शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला बेट देऊ शकतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले.

आक्षेप घेण्याची संधी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मार्च 2021 सत्राची उत्तरतालिका दोन दिवसांपूर्वी (JEE Main March Session) जाहीर केली होती. विद्यार्थ्यांना आक्षेप आक्षेप नोंदवण्यास मुदत दिली होती. नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन मार्च 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

TRP Scam | अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना आदेश

सचिन वाझेबरोबर ट्रायडंट हॉटेलमध्ये गेलेली ती महिला कोण? एनआयएच्या तपासात आणखी माहिती उघड