जेईई मुख्य निकाल जाहीर झाला असून यामध्ये देशातील ६ विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत १०० पर्सेंटाइल (एनटीए स्कोअर) मिळवून अव्वल आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबईचा सिद्धांत मुखर्जी याने सुद्धा बाजी मारली आहे. मुंबईच्या अंधेरीत राहत असलेल्या सिद्धांतने ऍलन अकॅडेमीतून अभ्यास करत कोटा , राजस्थान येथून जेईई २०२१ दिली. कॉम्पुटर सायन्समध्ये करिअर करू इच्छिणारा सिद्धांत जेईई एडव्हान्सची तयारी करून अधिक चांगला रँक मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सिद्धांताच्या आईने नमूद केले आहे.
दहावीपर्यंत वांद्रे कुर्ला संकुलातील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेमधून झालेल्या सिद्धांतने पुढील शिक्षण दिशा डेल्फी पब्लिक स्कुलमधून घेतली आहे. कोविड १९ च्या काळामधील संधीचा फायदा घेत आपल्या प्रवासाचा वेळ वाचावीत आणि ऑनलाईन क्लासेसवर पूर्ण लक्ष देऊन अभ्यास केल्याचे त्याने नमूद केले. या यशाने हुरळून न जाता आपले लक्ष्य हे जेईई एडव्हान्समध्ये चान्गले गुण आणणे हे असल्याचे त्याने अधोरेखित केले.
सिद्धांतचे वडील संदीप मुखर्जी यांची रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टंसी असून आई नवनिता मुखर्जी या सीए आहेत. या दोघांच्याही आपल्या यशात मोलाचा वाटा असल्याचे सिद्धांतने सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमीच्या भ्यासावर लक्ष केंद्रित करावे , सीबीएसईचा अभ्यास करावा आणि परीक्षेची तयारी करावी असा कानमंत्र ही त्याने दिला.
इनोव्हेट इन इंडिया फॉर इंडिया
शिक्षण कुठेही झाले तरी देशातील नागरिकांसाठी , त्यांचा वेळ वाचेल, त्यांच्या दैनंदिन वापरात उपयोग होईल असे काहीतरी आपल्याला शिक्षणातून भारतीयांसाठी करायचे असल्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. हे संशोधन किंवा शिक्षणातून घडलेले उपक्रम देशवासीयांसोबतच जगालाही उपयुक्त होईल असे कार्य करायचे असल्याचे सिद्धांताने नमूद केले आहे.
Comments
Loading…