in

JEE MAIN | जेईई मेन परीक्षेला स्थगित

देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी या परीक्षा २७, २८ आणि ३० एप्रिल २०२१ या तीन दिवसांत घेण्यात येणार होत्या, मात्र देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सुरक्षेच्या कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (NTA)ने स्पष्टीकरण दिले की, जेईई परीक्षांचा नव्या तारखा परीक्षा घेण्याआधी कमीत कमी १५ दिवसाआधी जाहीर करण्यात येतील.

एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन (JEE MAIN’S) परीक्षांचा हा तिसरा अटेंम्पट होता. मात्र कोरोना महामारीमुळे जेईई परीक्षांवरही परिणाम झाला. जवळपास ६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी इंजिनियरिंग प्रवेश परीक्षासाठी बसणार होते. मार्चमध्ये झालेल्या अटेंम्पटला ६ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी अर्ज केला होता. परंतु यातील ६ लाख १९ हजार ६३८ विद्यार्थींच उपस्थित राहू शकले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 | दिल्लीसमोर आज पंजाबचे आव्हान

मी बंगालमधील माझ्या सर्व रॅली रद्द केल्या, तुम्ही कधी करणार?