in

”माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही”;जयंत पाटलांचं ट्वीट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळतेय. अशावेळी स्वत: जयंत पाटील यांनी एक ट्वीट करुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाल्यामुळे चर्चा सुरु झाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Landslide । पूरग्रस्तांसाठी तात्पुरती १० हजाराची मदत जाहीर

Maharashtra Cabinet : ‘एसडीआरएफ’मधील निकषांप्रमाणे पूरग्रस्तांना मदत करणार; मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय