in ,

‘लसीचा तुटवडा असताना पाकिस्तानला पुरवठा का?; जयंत पाटलांचा पंतप्रधानांना सवाल

लसीकरणावरून केंद्र आणि राज्यात शाब्दिक युद्ध रंगले असताना आता देशासह महाराष्ट्रात लसीचा तुटवडा भासू लागला आहे. यावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. देशात लसीचा तुटवडा भासत असताना पाकिस्तानला पुरवठा का करताय ? असा सवाल उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ११ एप्रिल महात्मा फुलेच्या जयंती पासून १४ एप्रिल पर्यंत लसीकरण उत्सव साजरा करूया अशी घोषणा केली होती. या उत्सवावर लस असेल तर उत्सव होईल ना’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. लस मिळत नसेल तर टीका उत्सव साजरा करू असा चिमटाही काढला. तसेच लसीचे नियोजन करण्यात केंद्र अपयशी ठरल्याचीही टीका केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Prince Phillip: प्रिन्स फिलीप यांचे ९९ व्या वर्षी निधन… राजघराण्यावर शोककळा

Sachin Vaze | अँटिलिया प्रकरण सोडाच…वाझेची याहून मोठी प्लानिंग होती!