in

OBC Reservation | “ओबीसींचा काळवळा असेल.. तर प्रश्न कसा सोडवाल ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही”

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून राज्यभरात वातावरण तापलं असताना विरोधी पक्षाने देखील मोर्चे काढले. भाजपाच्या विविध नेत्यांनी राज्यभरात ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनं केली. यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीला टार्गेट केलंय. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.

ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा.. आम्ही प्रश्न सोडवू, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही, जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

नांदेडमध्ये आयोजित पात्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. सत्तेत आल्यानंतर 4 महिन्यात ओबीसींचा प्रश्न सोडवू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर जयंत पाटील यांनी पलटवार केलाय. सत्तेत आल्याशिवाय काही करायचं नाही का, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ठाकरे सरकारमुळे ओबीसींचे आरक्षण गेले’ – रामदास आठवले

‘आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल तर…’ आमदार रोहित पवार यांचा भाजपला इशारा