in

…तर जयंत पाटील भाजपात असते – नारायण राणे

Share

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले नसते तर तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजपात असल्याचा गोप्यस्फोट भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच जयंत पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

दरम्यान पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्राचारार्थ बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणेंवर खरमरीत टीका केली. “गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

शिवसेना नेत्याकडून अजान स्पर्धेचं आयोजन; भाजपची टीका

पवईत म्हाडा इमारतीला लागली भीषण आग