अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीने गृहमंत्रीपदाची सूत्रे दिलीप वळसे पाटील यांच्या हातात दिली आहेत. आज दुपारी वळसे पाटील यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाविकास आघाडीतील जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही वळसे पाटलांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी वळसे पाटील यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत शिस्त आणि कायद्याची सखोल जाण असणारे प्रशासक असा त्यांचा उल्लेख केला आहे.
Comments
Loading…