in

जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात; मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली

संजय देसाई । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.

मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाचा ती बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील हॉस्पिटलमध्ये रवाना झाले.जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Watch Video; ‘मी काय कुंद्रा आहे का?; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

”तळीये गावाच्या जवळच पुनर्वसन करणार”