in ,

जान कुमार सानूचं वादग्रस्त वक्तव्य; कलर्स वाहिनीचा माफीनामा

Share

बिग बॉसच्या 14 व्या सिझनमधील एका कार्यक्रमात एका स्पर्धकाने मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर मनसे व शिवसेना आक्रमक झाली होती. तसेच मराठी जनांकडून यावर संताप व्यक्त होत होता. त्यानंतर आता कलर्स वाहिनीने या प्रकरणी माफी मांगितली आहे.

वाद काय
बिग बॉसच्या या सिझनमध्ये राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी याच्यात वाद सुरु होता. यावेळी “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. दरम्यान, यानंतर शिवसेना नेते सरनाईक यांनी जान सानूला बिग बॉसमधून वगळण्याची मागणी केली आहे.तसेच मनसे हि यावर आक्रमक झाली होती.

दरम्यान सर्वच स्तरावरून टीका झाल्यानंतर आता कलर्स वाहिनीने मराठी भाषेचा अपमान झालेप्रकरणी माफी मागितली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कलर्सने ही माफी मागितली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्य सरकारकडून कांदाप्रश्नी जास्त अपेक्षा करू नये – शरद पवार

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी