in

जळगाव शहरात ११ ते १५ मार्चदरम्यान जनता कर्फ्यू

राज्यात कोरोनाचा विळखा वाढता जात आहे. जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होता नसल्यामुळे जळगाव शहरात ११ ते १५ मार्च दरम्यान जनता कर्फ्यूची घोषित करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी असे आदेश दिले आहेत.

एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शहरातील मुख्य बाजारपेठ भागात गर्दी कमी होताना दिसून येत नाही. त्यातच अनेक नागरिक विनामास्क शहरात फिरताना दिसून येत आहेत. यासह अनेक दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचेदेखील पालन होत नसल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शहरात पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात, गर्दी नियंत्रणासाठी जळगाव शहरात ११ मार्चला रात्री ८ वाजेपासून ते १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अर्जुन कपूर आणि परिणीतीच्या ‘संदीप और पिंकी फरार’चा ट्रेलर रिलीज

माझी चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे गृहमंत्र्यांना खुलं आव्हान