in ,

“तो बॉम्ब नाही, भिजलेला लवंगी फटाका”

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड दबाव आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सध्या तरी ही मागणी फेटाळली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. दरम्यान या भेटीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला फटाका असल्याचा टोला लगावला आहे. अहवालात काही दम नसून त्याला काडीचीही किंमत नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

“तो जो काही बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला

“दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशात रुग्ण दुप्पटीचा वेग २०२ दिवसांवर…५०४ दिवसांवरून मोठी घसरण

Phone Tapping : काँग्रेसला नक्की किती हिस्सा मिळतो? फडणवीस आक्रमक