in

… तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही,मनसेचा थेट इशारा

मराठी कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजु साप्ते यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. तत्पूर्वी एक सुसाईड व्हिडिओही त्यांनी बनवला आहे. त्यानंतर, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, यापुढे कलाकारांना त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच आहे, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येपासून चित्रपट क्षेत्राशी संबंधित कलाकारांच्या आत्महत्या चर्चेचा विषय बनत आहे. आता, आणखी एका कलाकाराने व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, त्यामध्ये आत्महत्येचं कारण सांगितल आहे. लेबर युनियमधील राकेश मौर्य यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचे साप्ते यांनी म्हटलं आहे. साप्तेंच्या निधनाच्या वृत्तानंतर मनसेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी भविष्यात कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच समजा, असा थेट इशाराच खोपकर यांनी फेसबुक अकाऊंटवरुन दिलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Covid 19 : कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

सीबीआयला सचिन वाझेची चौकशी करण्याची परवानगी