in

Israel corona Free | इस्रायलने कोरोना फ्री

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात असताना इस्रायल (Israel) हा देश मात्र अपवाद ठरताना दिसत आहे. आतापर्यंत जगभरात प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलने कोरोनाचा पूर्णपणे पराभव केला आहे. सध्याच्या घडीला इस्रायलमध्ये कोणतेही निर्बंध नसून लोकांना मास्कविना फिरण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

फक्त एखाद्या खोलीत किंवा बंदिस्त जागेत जास्त गर्दी असल्यास तोंडावर मास्क लावण्याची सक्ती आहे.
तसेच देशातील सर्व शिक्षणसंस्थाही सुरु करण्यात आल्या आहेत. अगदी प्राथमिक शाळाही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला इस्रायलमधील तब्बल 60 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात इस्रायलमध्ये कोरोनामुळे फार मोठा प्रभाव पडणार नसल्याचा दावा केला जात आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इस्रायलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने केली ५ जणांची हत्या

job opportunities | ‘या’ चार मोठ्या कंपन्या देणार 1 लाख नोकऱ्या