in

९ एप्रिलपासून IPL २०२१ला सुरुवात

इंडियन प्रीमियर लीग २०२१ला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईत उद्घाटनाचा सामना खेळवला जाईल. तब्बल पाच वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं बीसीसीआयनं आयपीएलसाठी आठ स्टेडियम्सची निवड केली आहे. यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा समावेश आहे. 30 मे रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्ले-ऑफ आणि अंतिम सामना खेळवला जाईल.

आयपीएल २०२१ मध्ये एकाच दिवशी दोन सामने खेळले जाणार आहेत. दुपारी सामने साडे तीन वाजता सामने सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने साडे सात वाजता सुरू होतील. गेल्याच वर्षी बीसीसीआयनं यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन केलं होतं. देशात कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्यानं आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली गेली. यानंतर आता भारतात सुरक्षितपणे स्पर्धा आयोजित करण्याचा विश्वास बीसीसीआयनं व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साप्ताहिक राशीभविष्य: 8 मार्च ते 14 मार्च 2021

गोव्यात शिवसेना स्वबळावर 25 जागा लढवणार – संजय राऊत