in

IPL 2021चं वेळापत्रक जाहीर.. ‘या’ दिवशी होणार अंतिम सामना

बायो बबलमध्ये कोरोनाच्या प्रवेशानंतर बंद करण्यात आलेली आयपीएल आता पुन्हा सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आलीय.त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये कोरोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे.

आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा; सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Fire In Pune | पुण्यातील मुळशीच्या सॅनिटायझर कंपनीला आग… १८ जणांचा मृत्यू