महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या राज्य सरकारनं पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. पण, त्याचवेळी मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल आणि ३० एप्रिलपर्यंत ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वानखेडे स्टेडियमजवळ राहण्यारा स्थानिकांनी सामने इतरत्र हलवावे अशी विनंती त्यांचाकडे केली आहे. स्टेडियम शेजारील अनेक इमारती कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सील केल्या आहेत. तसेच इमारतींमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आयपीएलच्या सामन्याच्या वेळी होणारा आवाज व तीव्र लाईट्समुळे त्यांना त्रास होणार. प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी दिली नसली तरी खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर लोकांची गर्दी वाढेल यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Comments
Loading…