in

IPL 2020 : 13 व्या हंगामाच्या गाण्यावरून वाद; गाणं चोरी केल्याचा आरोप

Share

आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामाच्या गाण्यावरून वाद सुरू झाला आहे. दिल्लीच्या रॅपर कृष्णाने असा आरोप केला आहे की, आयपीएल 2020 चे गाणे त्याच्या रॅपवरून चोरी करून तयार केले गेले आहे. प्रणव अजयराव मालपे यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या रॅप गाण्याला चोरी करून हे गाणे तयार केल्याचा आरोप त्याने केला आहे.

यावर्षी आयपीएलच ‘आयेंगे हम वापस’ हे गाणं संगीत दिग्दर्शक अजयराव मालपे यांनी तयार केले आहे. रॅपर कृष्णाच्या म्हणण्यानुसार, हे गाणे 2017 मध्ये त्याच्या प्रदर्शित झालेल्या ‘देख कौन आया वापस’ गाण्यातून चोरी झाले आहे.

तो म्हणाला, “आयपीएल आणि हॉटस्टारसारख्या बड्या कंपन्यांनी माझे गाणे मला न विचारता कॉपी केल्याने मला खूप निराश केले आहे. माझे व्यवस्थापन संघ आणि कायदेशीर संघ यासंदर्भात कारवाई करण्याची तयारी करत आहेत.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “आगामी कलाकारांसाठी हा इशारा आहे असे मला वाटते. मी बर्‍याच काळापासून संगीत उद्योगात काम करत आहे आणि माझी एक चांगली व्यवस्थापन टीम आहे.”

आयपीएलचा 13 वा हंगाम युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएल 2020 च्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. आयपीएल 2020 चे 24 सामने दुबई, 20 सामने अबू धाबी आणि 12 सामने शारजाह येथे होणार आहेत.

प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. या-53 दिवसीय स्पर्धेत भाग घेणारे सर्व आठ फ्रँचायझी संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत आणि सध्या सराव करीत आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोना

या वीकेंडला जाऊ शकता फिरायला ; हॉटेल्स, होम-स्टेबाबत कार्यप्रणाली जारी