in

विद्रोही साहित्य संमेलानाचे पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला निमंत्रण?

Swedish environmental activist Greta Thunberg speaks to the media at the European Parliament in Strasbourg, Eastern France, Tuesday April 16, 2019. (AP Photo/Jean-Francois Badias)

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनास सोशल मीडियावरुन पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला नाशिक शहरात होऊ घातलेल्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी आमंत्रण देण्याचा निर्धार आयोजकांनी नियोजन बैठकीत केला आहे.

हुतात्मा स्मारकात रविवारी (दि.७) विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठकीत ग्रेटा थनबर्ग यांना उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देऊन त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच संमेलनाच्या नियोजित समित्यांविषयीही चर्चा करण्यात आली असून रविवारी (दि.१४) विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

तसेच दि. २० मार्च‌ ते २५ मार्च या कालावधीत बाबुराव बागूल यांच्या स्मृतीदिनानिमित्त सप्ताह व विहित गावातील त्यांच्या निवासस्थानापासून मशाल ज्योत काढून संमेलनाचे दीपप्रज्वलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीस अश्पाक कुरेशी, सदाशिव गनगे, अर्जुन बागुल, विजया दुर्धवळे, राजेंद्र जाधव, नीलेश सोनवणे, रवींद्र पगारे, ताराचंद मोतमल, दीपाली वाघ आदी उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भविष्यात भाजपा हा पक्षच उरणार नाही, नाना पटोलेंचे फडणवीसांवर टीकास्त्र

उपचाराची फी मागितल्याने डॉक्टरचे बोट छाटले