in , ,

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद

Share

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे. या संदर्भातले परिपत्रक जारी करुन आदेश दिले आहेत.

डीजीसीएने याआधी आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातील विमानसेवा सुरु होण्याची शक्यता होती. मात्र आता कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.

विशेष म्हणजे ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल. तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ठाण्यात पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

India vs Australia : ‘त्या’ दिग्गज खेळाडूसाठी दोन्ही संघ 63 सेकंद मौन बाळगणार