in

आता इन्स्टाग्राम फुकट नाही? महिन्याला पैसे मोजावे लागणार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम सध्या विनाशुल्क वापरता येत असलं तरी लवकरच त्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण इन्स्टाग्राम नव्या सब्सक्रिप्शन फीचरवर काम करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंती असलेल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटसाठी आता युझर्सना पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

इन्स्टाग्राम आता नव्या सब्सक्रिप्शन फीचरवर काम करत असून, त्यानुसार कंटेट अ‍ॅक्सेस करण्यासाठी युझर्सना दरमहा 89 रुपये द्यावे लागणार आहेत. याचा इन्स्टाग्राम क्रिएटर्स आणि एन्फ्लुएन्सर्सना फायदा होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.अद्याप कंपनीनं या पेड फीचरचं अधिकृत धोरण जाहीर केलेलं नाही. जो इन्स्टाग्राम युजर 89 रुपये देऊन सब्सक्रिप्शन घेईल त्याला एक बॅच देण्यात येईल. त्यानंतर युझरने काही कमेंट किंवा मेसेज केला तर त्याच्या युजरनेमसमोर हा बॅच दिसणार आहे. या माध्यमातून युझरला `सब्सक्रिप्शन घेतलेला युझर्स अशी ओळख मिळणार आहे. सब्सक्रिप्शननंतर क्रिएटर्सना मिळणारं उत्पन्न आणि मेंबरशिप संपण्याविषयीचा तपशीलपण दिसणार आहे.

एका वृत्तानुसार, इन्स्टाग्राम सब्सक्रिप्शन इन-अ‍ॅप पर्चेसअंतर्गत अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरच्या यादीत समाविष्ट आहे. यासाठी इन्स्टाग्राम सब्सक्रिप्शन कॅटेगरीही तयार करण्यात आली आहे. सध्या तरी तेथे 89 रुपये प्रतिमहिना चार्ज दर्शवण्यात येत आहे. युझर्ससाठी हे सब्सक्रिप्शन लागू झाल्यावर त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नंदुरबारमध्ये 28 एसटी कर्मचारी निलंबित

एसटी संपाला वसईत गाळबोट; बस सेवा सुरू ठेवल्याने वाहकावर शाही फेक